शाळा प्रवेशासाठी पालकांवर कर्ज काढण्याची वेळ

मुंबई: शाळा प्रवेश घेताना डोनेशन घेणे हे बेकायदा ठरविण्यात आले आहे. याला पर्याय म्हणून शहरातील अनेक नामांकित शाळांनी अनामत रकमेच्या नावाखाली पालकांची लूट सुरू केली आहे. तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला वेळप्रसंगी कर्जही काढावे लागेल. कारण मुंबईतील काही शाळांनी अनामत रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली असून ती एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आहे.
शहरातील विविध शाळांमध्ये एक लाख रुपयांपासून ते तब्बल २५ लाख रुपयांपर्यंतची अनामत रक्कम घेतली जात आहे. याबाबत कोठेही तक्रार करण्याची सोय नसल्याने पालक हतबल झाले आहेत. पाल्याच्या शाळा प्रवेशावेळी डोनेशन घेण्यास बंदी घालण्यात आल्याने त्याऐवजी अनामत रक्कम घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. ही रक्कम ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी शाळांना देण्यात आल्याने शैक्षणिक संस्थांकडून सर्रास मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. शाळा प्रवेशाचा हंगाम सुरू झाला आणि पालकांच्या तक्रारी डोके वर काढू लागल्या आहेत. इतकी वर्षे शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या डोनेशनबाबत तक्रारी होत होत्या. मात्र यंदा अनामत रक्कम घेण्याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत कोणी तक्रार करण्यास गेल्यावर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार परतावा असलेली अनामत रक्कम घेण्यास परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा