सिल्लोड येथे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सुरक्षा संचचे वाटप

सिल्लोड, २३ फेब्रुवारी २०२४ : सिल्लोड शहर व तालुक्यातील बांधकाम व इतर कामगार मंडळ अंतर्गत २ हजार नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. सिल्लोड शहरातील राम-रहिम व्यापार संकुल परिसरात आज हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन अब्दुल समीर, संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, दीपाली भवर, मेघा शाह, नगरसेवक रउफ बागवान, सुधाकर पाटील, आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, रतनकुमार डोभाळ, राजू गौर, मतीन देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशवराव तायडे, श्रीरंग साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, संदीप राऊत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, यांच्यासह डॉ. दत्ता भवर, संजय मुरकुटे, जगन्नाथ कुदळ, आदिंसह लाभार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ. सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा