केंद्राच्या रुग्णालयांत बंपर भरती, एकट्या एम्समध्ये २७ हजार जागा रिक्त

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर २०२२: सध्याच्या सरकारी वैद्यकीय प्रणाली मध्ये प्रखरतेने जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्या साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभर उभारण्यात आलेल्या आपल्या रुग्णालयांसह इतर संस्थांत ४० हजारहून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या अडीच वर्षांत ही भरती केली जाणार आहे. सध्या २७,५९९ पदे एकट्या एम्समध्ये रिक्त आहेत. अर्थ मंत्रालयानेही या पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. सुमारे चार वर्षांपासून ही पदे भरली गेलेली नाहीत.

वास्तविक, दीर्घकाळ रिक्त राहिलेली पदे अर्थ मंत्रालय रद्द करते. मात्र, यंदा हा निर्णय टाळण्यात आला आहे. ‘अ’ दर्जाच्या पदांसाठी यूपीएससीला कळवण्यात आले आहे, तर अ दर्जात पदोन्नतीसाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला कळवण्यात आले आहे. याशिवाय कार्मिक व प्रशिक्षण विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा