Pune Vidyapith Candle march attack Indian tourists Pahalgam Kashmir:दहशदवादी हल्याने काश्मीर पुन्हा एकदा हादरले आहे. या हल्यात सुमारे २० पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरमधील पाहलगाम येते ही घटना घडली असून या घटनेचे पडसाद आता सगळीकडे उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेचा निषेध आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुद्धा नोंदवला जाणार आहे. अशी माहिती पुणे विद्यापीठ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आदित्य डुंबरे यांनी दिली.
काश्मीरमधील फलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशदवाद्यांनी त्यांचे नाव व धर्म विचारून त्यांच्यावर केलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी ७.०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार ते मुख्य इमारतीपर्यंत “कॅन्डल मार्च” करण्यात येणार आहे. असे ABVP चे अध्यक्ष आदित्य डुंबरे यांनी सांगितली. ही संपूर्ण घटना अत्यंत चिंताजनक असून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर