आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ भाऊ लोखंडे निधन

नागपुर, २२ सप्टेंबर २०२०: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केलं होतं. ‘विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलना’चं आणि महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते.

लोखंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही डॉ भाऊ लोखंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाऊ लोखंडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहेत आशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा