राहुल तेवातिया ठरला राजस्थान रॉयल्स संघाच्या विजयाचा शिल्पकार

दुबई, ११ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० मधील सुपर संडे सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. सामना अटीतटीचा होणार हे नक्कीच होते. आज पुन्हा एकदा राहुल तेवातीया राजस्थान रॉयल्स संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. आणि त्याच्या खेळीमुळेच राजस्थान रॉयल्स संघाने ५ विकेट्स ने विजय मिळवला आहे.

सामन्यात, सनरायजर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांनी २० षटक अखेर ४ बाद १५८ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद संघाकडून फलंदाजी करतांना जॉनी बेअरस्टो हा स्वस्तात माघारी परतला. त्याने १९ चेंडूत अवघ्या १६ धावा केल्या, यात त्याने १ षटकार मारला. डेव्हिड वॉर्नर याने ३८ चेंडूत ४८ धावा केल्या यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तसेच मनीष पांडे याने अर्धशतकिय खेळी करत ४४ चेंडूत ५४ धावा केल्या. केन विलियमसन याने २२ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाकडून गोलंदाजी करतांना जोफरा आर्चर , के त्यागी आणि जयदेव उनाडकात यांना प्रत्येकी १, १ विकेट्स मिळाल्या.

१५९ धावांचा पाठलाग करताना आज राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना नवीन प्रयोग पाहायला मिळाला. नेहमी ४,५ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला येणारा बेन स्टोक यंदा ओपनिंग साठी आला होता. परंतु त्याने काही कमाल केली नाही फक्त ५ धावा केल्या. तसेच जोस बटलर याने १६ तर कर्णधार स्टीव स्मिथ याने ५ धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसन याने अवघ्या २६ धावा केल्या. सामना सनरायजर्स हैदराबाद संघाच्या बाजूने वळत असताना राहुल तेवतिया याने पुन्हा एकदा विजयी खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. राहुल तेवटिया याने रीयन पराग सोबत मिळून राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. तेवतीया ने २८ चेंडूत ४५ धावा केल्या. तसेच पराग ने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करतांना रशीद खान आणि खलील अहमद यांना प्रत्येकी २ ,२ विकेट्स मिळाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा