रायगडावर घुमला दुबईच्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचा नाद

45
Trivikram Dhol Tasha Performance at Raigad 2025

Trivikram Dhol Tasha Performance at Raigad 2025: शिवाजी महाराज ज्यादिवशी छत्रपती झाले त्याला आज ३५२ वर्षे झाली. राजांच्या लाडक्या दुर्गदुर्गेश्वर रायगडावर भव्य सोहळा दरवर्षीप्रमाणे आयोजित केला, परंतु यावेळेस विशेष दाखल घ्यावी अशी एक गोष्ट घडली.

२०१७ साली संपूर्ण आखाती प्रदेशात पहिले असे दुबई येथे स्थापन झालेले त्रिविक्रम ढोल ताशा पथक यांचे दिमाखदार वादन पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. भारताबाहेरून येऊन वादन केलेले हे पहिलेच पथक आहे हे विशेष दखल घेण्याजोगे आहे.

दुबई येथे स्थापन झालेले त्रिविक्रम ढोल ताशा पथक;

रायगडावर आपल्या हातून सेवा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यातही परक्या देशात राहून आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट जोडले गेलेल्यांची तर केवळ तीव्र इच्छाच नव्हे तर स्वप्न अस ते की रायगडावर एकदा तरी वादन सेवा सादर व्हावी आणि ती संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर पाटील यांनी श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव समिती, रायगड यांचे मनापासून आभार मानले. त्याचं बरोबर महाड चे जगदंब पथकाने सुद्धा वध्य पुरवून हा विक्रम करण्यात विशेष मदत केल्यावद्दल त्याचे सुद्धा आभार मानले.

त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र दौरा २०२५ चा हा तिसरा टप्पा असून या आधी दोन टप्प्यात देखील पथकाने अतिशय सृजनशील कल्पना राबवत भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात आणि पुण्याच्या शिवसृष्टी येथे आपली सेवा सादर केली आहे आणि यापुढेही असे नवनवीन संकल्प घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचा पथकाचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी