पुणे १३ फेब्रुवारी २०२५: प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. तरुणाईपासून सर्वच वयोगटात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या खास दिवसासाठी खास गिफ्ट्सची बाजारपेठ सजली आहे. यंदाचा व्हॅलेंटाईन डे गिफ्ट्समुळे अधिक स्पेशल ठरणार आहे, यात शंका नाही.
शहरातील गिफ्टची दालने, केकची दुकाने, कॉफी शॉप या सर्वांवर प्रेमाचा रंग चढला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी हृदयाच्या आकाराचे लाल-गुलाबी फुगे, प्रेम संदेश लक्ष वेधून घेत आहेत. गुलाब, म्युझिकल लाइट, कॉफी मग, कपल मग, गोल्डन गुलाब, टेडी, बुके, म्युझिकल ग्रिटिंग्ज, कलर म्युझिकल पिलो, कपल टेडी, गिफ्ट हॅम्पर, काचेतील बॉलमधील कपल, डान्सिंग कपल, रोज गोल्ड ज्वेलरी, चॉकलेट, गिटार, पियानो, परफ्युम, वॉलेट, वॉचेस, ब्रेसलेट, पेंडंट, डिओ, प्रेमाचा संदेश देणारी मेणबत्ती, सेव्हन बॉटल, डॉल्स, कृत्रिम फुले, ब्रेसलेट, कपल रिंग, शो पीस, मिनियन कार्टून, टेडी चॉकलेट, डान्सिंग टेडी, व्हिजिट बॉक्स, मॅग्नेटिक टेडी, क्रिस्टल किचन, लेडिज वॉलेट, हार्ट, चॉकलेट बुके, अॅक्रेलिक थ्रीडी लाइटिंग अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजला आहे.
ऑनलाइन मार्केटमध्येही स्पेशल ऑफर्सची धूम आहे. परफ्यूम, पर्स, फ्लॉवर्स, स्कार्फ, हार्ट की यांसारख्या अनेक वस्तू कपलला आकर्षित करत आहेत. म्युझिकल ग्रिटिंग्ज, चॉकलेट, फोटोफ्रेम, चॉकलेट रोझेस, कॅन्डल्स, ज्वेलरी या गिफ्ट्सचे खास आकर्षण आहे.
२ इंग्रजीसह मराठी भाषेतील शुभेच्छा पत्रेदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. चॉकलेट ५० ते २००० रुपयांपर्यंत, टेडी बिअर २०० ते १०००० रुपयांपर्यंत, फोटो फ्रेम १५० ते १०००० रुपयांपर्यंत, तर शुभेच्छापत्रे ५० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ‘हार्ट’चे गिफ्टही हजारो रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल करण्यासाठी अनेक प्लॅन्स बनवत आहेत. फिरायला जाणे, कॉमेडी शो, म्युझिक शो, चित्रपट, पब, कँडल लाइट डिनर किंवा घरातल्या घरात पार्टी असे विविध सरप्राइज प्लॅन कपल्सनी केले आहेत. अनेक कॅफेमध्येही खास सवलती देण्यात आल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे