पुणे,दि. २३ एप्रिल २०२०: पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ हजार ३१ झाली असून विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण ८९४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात १ हजार ३१ बाधित रुग्ण असून ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ९३६ बाधीत रुग्ण असून ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ३७ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात ३७ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ हजार ४७ चा अहवाल प्राप्त झाल असून त्यात ६६२ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या अहवालांपैकी ९ हजार ९६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ३१ चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९२७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.