झारखंड, १० डिसेंबर २०२०: भारतात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. झारखंडच्या दुमका गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्कारात एक दोन नाही तर तब्बल १७ नरधमांनी पिडितेचे लचके तोडले.
पिडित महिला आपल्या पती सोबत जत्रेतून परतताना हा प्रकार घडल्याचे समजत आहे. पतीला पाच जणांनी धरून ठेवले होते व नंतर बारी बारी ने पिडितेवर बलात्कार करण्यात आला. विशेष म्हणजे पिडिता हि पाच मुलांची आहे.
पोलीस अधिक्षक अंबर लकडा यांनी डिआयजी सोबत मुफस्सिल ठाण्यात पोहचून संपूर्ण घटनेची शहानिशा करत पिडित महिलेचा जबाब घेतला आहे. तसेच गुन्ह्याची नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर महिलेला वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुमका जिल्हाच्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली असून संताप परागना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक सुदर्शन मंडल यांनी या घटनेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आसून पुढील तपास पोलीस करत आहे.
या घटने मुळे पुन्हा एकदा मानवी विकृतीचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. देशातील हे महिलांवरील अत्याचाराचे सत्र कधी संपेल? नेहमी स्त्री जातीवर प्रश्न करणारी पुरूषप्रधान संस्कृतीचाच असा चेहरा समोर येत आहे. तर मग मुलींचा,महिलेंचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जो नेहमीच ऐरणीवर आसतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव