२०२२ ची पोटनिवडणूक मतमोजणी सुरू; भाजप ३ जागांवर आघाडीवर, मुनुगोडेमध्ये टीआरएस

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२२ : ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सात मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आदमपूर मतदारसंघ, भारतीय जनता पार्टी हरियाणात उमेदवार भव्या बिश्नोई १०,७७८ मतांनी आघाडीवर असून काँग्रेसचे उमेदवार जय प्रकाश पिछाडीवर आहेत.

हरियाणाच्या आदमपूर जागेवर भाजप, काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील लढत झाली असून एकूण ७५.२५ टक्के मतदान झालय. आदमपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव कुलदीप बिश्नोई यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑगस्टमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने पोटनिवडणूक आवश्यक झाली. बिष्णोई यांचे चिरंजीव भव्य यांनी भाजपचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढवली. काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री जय प्रकाश यांना उमेदवारी दिली, तर INLD ने काँग्रेसचे बंडखोर कुर्डा राम नंबरदार यांना उमेदवारी देण्यात आली. सतेंदर सिंग हे आपचे उमेदवार होते. विशेष म्हणजे, आदमपूर मतदारसंघ हा बिश्नोईंचा बालेकिल्ला मानला जातो.

दरम्यान, ताज्या ट्रेंडनुसार, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) दोन्ही विधानसभा जागांवर आघाडीवर आहे- मोकामा आणि गोपालगंज. बिहारमधील मोकामा विधानसभा जागेसाठी आरजेडीच्या नीलम देवी ३५,०३६ मतांनी आघाडीवर आहेत तर गोपालगंजमध्ये मोहन प्रसाद गुप्ता आघाडीवर आहेत. बिहारमध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतली. महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आरजेडी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती.
बिहारमध्ये भाजप आणि आरजेडीमध्ये मुख्य लढत आहे.

मोकामा पोटनिवडणुकीसाठी, भाजपने सोनम देवी यांना आरजेडीच्या नीलम देवी यांच्या विरोधात उभे केले आहे, ज्यांचे पती अनंत सिंह यांच्या अपात्रतेमुळे पोटनिवडणूक आवश्यक होती. उल्लेखनीय म्हणजे, २००५ पासून मोकामा हा अनंत सिंह यांचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. त्यांनी दोनदा जदयूच्या तिकिटावर विजय मिळवला. भाजपचे विद्यमान आमदार सुभाष सिंह यांच्या पत्नी कुसुम देवी यांना भाजपने तिकीट दिले आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजपचे अमन गिरी सध्या उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ विधानसभा जागेवर ४९,१४२ मतांसह आघाडीवर आहेत, तर सपाचे विनय तिवारी यांना आतापर्यंत ३५,१४४ मते मिळाली आहेत. यासाठी भाजपने अमन गिरी यांना उमेदवारी दिली होती, तर समाजवादी पक्षाने (एसपी) माजी आमदार विनय तिवारी यांना तिकीट दिले आहे.

अंधेरी पूर्व येथे ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उमेदवार रुतुजा लटके १४,६४८ मतांनी आघाडीवर आहेत. रुतुजा लटके या शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. एकनाथ शिंदे आणि इतर ३९ आमदारांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. रुतुजा लटके यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिलाय.

ओडिशाच्या धामनगरमध्ये भाजपचे सूर्यवंशी सूरज ८,७३७ मतांसह आघाडीवर आहेत, ज्यांनी धामनगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६६.६३ टक्के मतदान नोंदवले. दरम्यान, बीजेडीच्या अबंती दास यांना ७,३५८ मते मिळाली. ओडिशाच्या धामनगर पोटनिवडणुकीत, सत्ताधारी बीजेडी उमेदवार अबंती दास आणि भाजपचे उमेदवार सूर्यवंशी सूरज स्थितप्रजाना यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. हे भाजपचे आमदार बिष्णू सेठी यांचे पुत्र, ज्यांच्या निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाली होती.

मुनुगोडे जागेवर टीआरएस उमेदवार कूसकुंतला प्रभाकर रेड्डी सध्या ६,४१२ मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार कोमातिरेड्डी राज गोपाल रेड्डी ५,१२६ मतांनी पिछाडीवर आहेत. मुनुगोडे येथे भाजप आणि सत्ताधारी टीआरएसने आक्रमक प्रचार केला होता. सहा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत, निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, तेलंगणातील मुनुगोडे मतदारसंघात गुरुवारी सर्वाधिक ७७.५ टक्के मतदान झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा