नवी दिल्ली : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही अद्याप आयकर (ITR) भरला नसेल तर तुम्हाला दंडात्मक शिक्षा होऊ शकते. विलंब शुल्कासह आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्यांना ५ हजार तर त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्यांना १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
यापूर्वी ३१ जुलैपर्यंत रिटर्न फायलिंगची मुदत दिली होती.
त्यानंतर पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत रिटर्न फायलिंगसाठी वेळ देण्यात आली. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना विलंब शुल्क म्हणून १ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.