सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवावा- विजय डाकले

पुणे, २२ जानेवारी २०२१:  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवावा अशी- विजय डाकले यांनी  मागणी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे या परिसरामध्ये देशातील पहिली क्रांतीकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवावा आणि मुलींच्या वसतीगृहास मुक्ता साळवे यांचे नाव द्यावे अशी मागणी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु मा. नितिन कळमळकर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय

विभागाचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांनी केली आहे. शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांची पहिली विद्यार्थिनी म्हणुन मुक्ता साळवे या इतिहासात अजरामर आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे, मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवून व वस्तीगृहास त्यांचे नाव देऊन त्यांच्याही क्रांतीकारी कार्याला ऊजाळा द्यावा यासाठी काल विजय डाकले यांनी विद्यापीठाचे कुलगुरु नितिन कळमळकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कुलगुरुंनी याबाबत नाव देण्याबाबत सकारत्कमता दाखवून नाव देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. या बैठकीसाठी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, राष्ट्रवादीचे युवक शहर ऊपाध्यक्ष सचिन डाकले आदी हजर होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा