पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

मध्यप्रदेश २७ जून २०२३: मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकांवरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेससह देशातील इतर ५ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर ४ वंदे भारत एक्स्प्रेसला भोपाळमधूनच हिरवा झेंडा दाखवून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्स्प्रेसचे उद्धाटन केले.

यात भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकांवरुन सुटणारी भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस तसेच भोपाळ-जबलपूर एक्स्प्रेस, रांची-पाटना एक्स्प्रेस, धारवाड-बंगळूर एक्स्प्रेस आणि गोवा-मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्धघाटनानंतर, भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील बूध कार्यकर्त्यांशी पीएम मोदी हे संवाद साधणार आहेत.

ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातानंतर, नियोजित वंदे भारत ट्रेन्सच्या उद्धाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व पीएम मोदी यांच्या हस्ते गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकांवरुन भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला, पीएम मोदी यांनी उपस्थीतीत राहुन हिरवा झेंडा दाखवला.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा