अनिल रामोड यांच्या घरातून सहा कोटी ६४ लाखांची रोकड जप्त, पत्नीच्या नावावर कंपनी

पुणे, ११ जून २०२३ : पुण्याचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना ८ लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे.अनिल रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. परंतु रामोड हे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखों रुपयांची लाच मागत होते.

पुण्यातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड सीबीआय च्या तडाख्यात सापडले आहेत. त्यांंच्या निवासस्थानी आणि कार्यालयात सीबीआयने टाकलेल्या छाप्यांत कोट्यवधी रुपयांची संपत्ती हाती लागली आहे. त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातून तब्बल सहा कोटी ६४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात समोर आले आहे. दरम्यान अनिल रामोड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर रामोड चौकशीत सहकार्य करत नाहीत.तापसमध्ये ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी तक्रार सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात केलीे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा