दौंड : कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रात लागलेल्या मोठ्या आगीच्या घटनेमुळे पुणे सोलापूर महामार्ग बंद असुन सुमारे वीस किलोमीटर पर्यंत नागरिकांना येण्यास मज्जाव असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणी क्षणातच हा मेसेज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरू लागला तसं तसा कुरकुंभ येथील अनेकांना मोबाईलवर विचारणा करणारे शेकडो काँल्स येऊ लागल्याने कुरकुंभमध्ये स्पोट झाल्याची चर्चा जोर धरू लागली.अनेकांनी औद्योगीक क्षेत्राच्या परिसरात घिरट्या घालण्यास सुरुवात केली मात्र काही केल्याने नक्की काय प्रकार,कुठे घडला आहे याचा तपास लागेना त्यामुळे हा मेसेज फक्त अफवा असल्याची खात्री ग्रामस्थांना झाली मात्र अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत अनेकांना आपल्या नातेवाईकांनी फोनकरून विचारणा केल्याने डोकेदुखी वाढली.
बुधवार (दि.१५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ मधील काही ग्रामस्थांना स्पोट झाला आहे का अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने अनेकांनी खात्री करण्यासाठी औद्योगीक क्षेत्र व परिसरात जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली.कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अग्निशामक दलाल देखील अनेकांनी विचारले मात्र कुठल्याही प्रकराची घटना त्यांच्या पर्यंत आली नसल्याचे सांगण्यात आले.अनेकांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावत चर्चांचे गुऱ्हाळ दिवसभर चालूच ठेवले.रात्री अकरा पर्यंत हा सर्व प्रकार सुरूच होता.शेजारील जिल्हातील देखील फोन येऊ लागल्याने अफवेचा प्रसार बराच दूरपर्यंत झाला असल्याचे लक्षात आले.पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोल नाक्यावर लागलेल्या लांब रांगेमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमीक अंदाज चर्चिला जाऊ लागला आहे.कारण कुरकुंभ येथे स्पोटामुळे वाहनांना पुढे जात येत नसल्याचे सांगितले जात आहे असा समज करण्यात आला असल्याची माहीती मिळत आहे.त्यामुळे हा प्रकार पाटस पासुन सुरु झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान मागील वर्षी(दि.१४) ऑगस्टच्या रात्रीत अल्काईल अमाईन्सच्या स्पोटातील घटनेची उजळणी सर्वांनाच झाली. याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ एका मेसेजद्वारे हा सर्व प्रकार फक्त अफवा असल्याचे सांगीतले तर कुरकुंभच्या पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी देखील अश्या प्रकारे अफवा पसरवणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना दिले आहे.