नवी दिल्ली: राज्यभरासह देशभरात करोनाचे सावट असल्याने देशपातळीवर करोना या महासकंटाशी सामना करायाला देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूनंतर संपुर्ण देश २१ दिवस लॉक डाऊन असणार अशी घोषणा केली.
पंतप्रधानांच्या या निर्णयाला जनता देखील चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. देश एका महान संकटातून जात असताना सीआरपीएफ जवानांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जवानांनी आपल्या एका दिवसाच्या पगारातून जमा झालेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. ३३.८१ कोटी इतकी रक्कम गोळा झाली आहे.
करोनासारख्या भीषण संकटातून देश पुढे सरसावत असताना सीआरपीएफ जवान देखील कुठे मागे राहिले नाहित. सीआरपीएफ जवानांनी मदतीचा हात पुढे करत आपल्या एका दिवसाच्या पगार पंतप्रधान सहाय्यता निधीला देत मोठी मदत केली आहे.
या मदतीसाठी एकूण ३३.८१ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांच्या सहमतीने एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीआरपीफ प्रवक्यांनी सांगितले. देशासोबत सीआरपीएफ जवान खंबीरपणे उभे असल्याचे देखील ते म्हणाले. सेवा आणि निष्ठेसहीत सीआरपीएफ सदैव तत्पर राहीलं असेही ते म्हणाले.
देशासोबत सीआरपीएफ जवान खंबीरपणे उभे असून करोनाविरूद्ध असलेल्या या युद्धासाठी सर्वानुमते एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात करोनाबाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १२५वर पोहोचली असून गुरूवारी एका दिवसांत पुन्हा एकदा तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृतांचा आकडा हा ५ वर पोहोचला आहे. या दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.