मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात सध्या लाॅकडाऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे २१ दिवस घरातून बाहेर पडू नका असा संदेश दिला आहे. त्यामुळे अचानक इतके दिवस घरी असलेली लोक विविध प्रकारे आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याशिवाय कोरोना व्हायरसमुळे शुटिंग सुद्धा रद्द करण्यात आले असल्याने कोणतेही नवे चित्रपट किंवा मालिका सुद्धा प्रसारित केल्या जात नाहीत. याचा फटका सिनेसृष्टीला होणारच आहे. टिव्ही चॅनल्सवर सध्या काही ठिकाणी रिपिट टेलिकास्ट दाखवले जात आहेत. मात्र घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी दुरदर्शन त्यांच्या आठवणीतले दोन कार्यक्रम लवकरच प्रसारित करणार आहे. दुरदर्शन रामायण-महाभारत पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय दुरदर्शनने घेतला आहे.
एकेकाळी रामायण आणि महाभारत हे दुरदर्शनवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय टिव्हीशोपैकी एक आहे. या कार्यक्रमांनी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मधील कलाकार सुद्धा प्रत्येकाच्या आठवणीत राहिले आहेत. त्यामुळे आता घरात राहणाऱ्या लोकांना वेळ जावा आणि मुलांवर संस्कार केले जावे म्हणुन आता रामायण – महाभारताचा आधार होणार आहे. वेळ लवकरचं सांगितली जाईल असं सांगण्यात आले आहे.