तरकारी वाहतूकदारांना क्वारंटाईन करा – इंदापूर तहसीलदार

इंदापूर दि. २६ एप्रिल २०२० : पुणे तसेच मुंबईमधील कोरोना विषाणूची दाहकता लक्षात घेता ’जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे’ यांनी त्यांचेकडील आदेशानुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली व इतर ठिकाणी संचार करणे, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे अशा सर्व कृत्यांना मनाई करणारा आदेश लागु केलेला आहे.

याच आदेशाला अनुसरून इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पुढील आदेश दिला आहे.
भाजीपाला, भूसार व इतर अत्यावश्यक साहित्याची वाहतुक मुंबई, पुणे व इतर ठिकाणहुन करुन व्यापारी/नागरीक पुन्हा गावी परत येतात. या व्यापारी/नागरीकांना आपण क्वारटाईन करणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे. या व्यापारी/नागरीकांवर लक्ष ठेवून त्यांना वेळीच गावाचा संपर्क न होवू देता कटारंटाईन करणेत यावे. अन्यथा सदर व्यापारी/ नागरीकांमुळे संसर्ग होण्याचा धोका होवू शकतो. त्यामुळे सदर बाब ही गांभीर्याने घेवून कार्यवाही करावी असे आदेश इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांना दिले आहेत. या आदेशाचे पालन करून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा