चीन, दि. २३ मे २०२०: चीनमध्ये कोरोनाव्हायरस वर लस बनवली जात आहे. या लसीच्या संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या लसीचे १०८ व्यक्तींवर परीक्षण करण्यात आले आहे. लस परिक्षणाच्या वेळेस असे आढळून आले की, या बाहेरच्या वायरसच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करण्यात हे सक्षम होत आहे.
चीनने शोधलेल्या या लस वरच्या परीक्षांविषयी मेडिकल जर्नल ‘द लेनसेट’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार संशोधकांनी या लस विषयी अनेक प्रयोगशाळांमध्ये संशोधन केले आहे. कॅनसिनो कंपनीने चीनची अॅड ५ लस तयार केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस आणि अमेरिकन कंपनी मॉडर्ना या लसच्या तुलनेत ही अधिक प्रभावी लस समजली जात आहे. या वर्षाच्या सुरूवातीस चिनी लसीची मानवी चाचण्या सुरू झाली होती.
तथापि, या लसचे साईड इफेक्ट सुद्धा दिसून आले आहेत. जसे की ताप येणे, वेदना होणे इत्यादी. परंतु महिन्याभरात दिसून येणारी ही सर्व लक्षणे बरी होऊन जातात. अभ्यासानुसार ही लस लागू झाल्यानंतर सुमारे २८ दिवसांनंतर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक होती. सध्या जगातील विविध देशांमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांची सुमारे १०० टीम या लसीच्या शोधात गुंतली आहेत.
फायझर, बायोटेक आणि कॅनसिनो या कंपन्यांनी कोरोना लसीची मानवी चाचण्या सुरू केली आहेत. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने गुरुवारी सांगितले की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करण्यासाठी अॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीला १.२ अब्ज डॉलर्स पर्यंत दिले जाईल.
सोमवारी अमेरिकन कंपनी मॉडर्ना यांनी कोरोना लसीच्या पहिल्या फेरीच्या चाचणीविषयी माहिती दिली. पहिल्या फेरीत केवळ आठ जणांना लस देण्यात आली. ही लस सुरक्षित असल्याचे दिसते आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे उत्पादन करते असे कंपनीने म्हटले होते. बुधवारी बोस्टनमधील संशोधकांनी सांगितले की लस प्रोटोटाइपमुळे माकडांना कोरोना संसर्ग होण्यापासून वाचविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी