नाशिक, दि.९ जून २०२० : शहरातील टाळेबंद उघडून बाजारपेठा सम – विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार खुल्या ठेवण्याबाबत महापालिका आयुक्त आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मात्र सोमवारी शहरात या नियमावलीला केराची टोपली दाखवल्यासारखी परिस्थिती पहायला मिळाली. तसेच मुख्य बाजार पेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकाने खुली दिसली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची बैठक केवळ एक निमित्त मात्र झाली आहे. या गर्दीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता मनपा आयुक्त पुढे सरसावले आहे.
उल्लंघन करणार्या बाजारपेठा त्वरीत बंद करून संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालीका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरातील सर्व विभागीय अधिकार्यांना दिले आहेत.
दुकाने उगडण्यासाठी सवलत दिली असली तरी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये याकरीता सम – विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार दुकाने सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहे.
शहर वाहतूक शाखने पी १, पी २ बाबत प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने १,३,५,७, ९ या पध्दतीने तर दुसर्या बाजुची दुकाने २,४,६,८,१० यानूसार सुरू ठेवण्यात येतील असे निर्देशित करण्यात आले.
मात्र, व्यापारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय होत नसल्याने याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. मात्र आता या नियमावलीचे पालन न करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराच महापालिका आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना दिला.
न्युज अनकट प्रतिनिधी: