नाशिक, दि. २६ जुलै २०२०: कोरोना महामारीच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईला आली आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती आणि चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पण त्याची वास्तविकता काय आहे आणि ते पॅकेज कुठे आहे असा टोला राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी मोदींना लगावला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा नाशिक दौरा होता. या दौऱ्यात नाशिकमधील लॉकडाऊन, रूग्णांची परिस्थिती, आरोग्य कर्मचारांचे काम या सर्व गोष्टींवर त्यांनी चर्चा केली तसेच माहिती देखील घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदींनी जाहीर केलेले ते २० लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले?, असा सवाल विचारला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील पवारांनी धारेवर धरले होते.
कोरोना महामारीच्या काळात अनेक खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरां विषयीच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांनी स्वत:हून पुढे यायला हवे, जर येत नसतील तर त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. असेही शरद पवार म्हणाले आहेत.
नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी ही व्यक्तव्ये केली, तर त्यांनी पाहणी मध्ये असलेल्या मुद्दांवर चर्चा देखील केली. शरद पवारांचे वयाच्या मानाने कार्यशक्ती हि तरुणाला ही लाजवेल अशी आहे. तर अनेक स्तरांवरुन त्यांच्या कामाची स्तुती होते. तर विरोधक हे आजही त्यांना टोले लगावताना दिसतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी