नवी दिल्ली: ब्राझीलच्या राष्ट्रपती जायर बॉलसोनारो यांनी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ब्राझीलमध्ये येण्यासाठी व्हिसाची गरज पडणार नाही. त्यामुळे भारत आणि चीनच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. हा निर्णय ब्राझील देशाला पर्यटनवाढीसाठी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रपतींनी दिली.
ब्राझीलमध्ये यावर्षी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत त्यानंतर बॉलसोनारो या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. त्यानंतर त्यांनी उद्योग आणि व्यापार वाढीकडे लक्ष केंद्रित केल्याचे या निर्णयावरून दिसते आहे. ब्राझीलच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना ही ब्राझीलमध्ये येण्यासाठी आता व्हिसाची गरज भासणार नाही.असे जाहिर केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारचे धोरण जाहीर केले होते.त्यानुसार राष्ट्रपतींनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या सरकारकडून विकसनशील देशांसाठी नागरिकांसाठी आता व्हिसाची गरज लागणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या निवडणुकीनंतर ब्राझीलचे राष्ट्रपती विविध देशांचे दौरे करणार आहेत.