बंगलूर, ३ ऑगस्ट २०२०: मागील ४ महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे जग व सगळे व्यवहार ठप्प पडलेत. याला आपला देश पण आपवाद नाही. पण या कोरोनामुळे भारतातील छोट्या मोठ्या उद्योगांचे व उद्योजकांचे बरेच नुकसान झाले.
भारत हा विविध जाती धर्माने नटलेला देश इथे प्रत्येत महिन्यात कोणता ना कोणता सण असतोच व त्या सणावर अनेक व्यवसाय चालतात. परंतू या कोरोनामुळे सगळे सण साधेपणाने व घरात राहूनच झाले.
मात्र आता भाद्रपदात येणारा देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणा-या गणेश उत्सवाचे वेध सर्वांना लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोविड १९ च्या काता दरम्यान, बंगळुरुमधील गणेशमूर्तींना गणेश चतुर्थीच्या आधीच डॉक्टरांचे स्वरूप देण्यात आले आहे. श्रीधर, नावाच्या एका मूर्तीकाराने सांगितले की , “आम्हाला कोविडचा सामना करावा लागत आहे. जगातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला भगवान गणेशांना प्रार्थना करण्यास सांगावे लागेल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी