कोरेगाव मुळ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरेगाव मूळ, १६ ऑगस्ट २०२०: काल १५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली. कोरोनाच्या काळात सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही व्यक्तींनीच उपस्थित राहून ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम काल करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिबिरामध्ये ७५ लोकांनी आरोग्याची तपासणी करुन घेतली व ५१ नाकरिकांनी स्व:इच्छेने रक्तदान केले. रक्तदात्याला सेनिटायझर, व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापनाचे कार्य महिला पोलीस मित्रांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती मुन यांनी केले तर आभार प्रियांका जाधव यांनी मानले .

‘समाजातील लोकांनी सामाजिक जाणीव ठेऊन मदतीचे सहकार्य व मदत करावी ‘असे मत ग्रामपंचायत कोरेगाव मुळ गावचे उपसरपंच विठ्ठल थोरात यानी आपले मनोगत यावेळी बोलताना व्यक्त केले. महिला पोलीस मित्र संघ शाखा ड्रिम्स निवारा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले विचार मांडले आहेत.

यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत कोरेगाव मुळ गावचे सरपंच लता चौधरी, सुरेश वाळेकर संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य, सामाजिक कार्यकर्ते सुरेश काकडे, राजाराम भंडारे, आनंदा चौधरी, तुळशीराम पांडोळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा