वन्य जीव प्राणी विषेश भाग ४ सर्प: धामण

मराठी_नाव -: धामण
विदर्भ -: धामण, मेनीधामन
इंग्लिश_नाव -: Indian Rat Snake
शास्त्रीय_नाव -: ptyas mucosa

सरासरी_लांबी -: २०० सें.मी. ( ६ फुट ७ इंच )
अधिकतम_लांबी -: ३५० सें.मी. ( ११फुट ७इंच )

रंगवआकार -: तपकिरी,शेवाळी,पिवळी, काळी.शरीरावर जाळीदार काळी नक्षी असते.ही नक्षी शेपटीकडूनं स्पष्टपणे दिसते. ओठांवरील खवल्यांव₹ काळ्या रेषा आसतात.डोक्यापेक्षा डोळे मोठे असते. डोळे मोठे व गोल बाहुली.फिकट.

प्रजनन -: मार्च -मे दरम्यान मादी ८-२० अंडी घालते. व दोन ते तीन महिन्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडतात.

खाद्य -: मुख्यतः बेडूक,चामखिळ बेडूक,उंदीर,सरडे पाली,पक्षी,घारी,वटवाघुळे व छोटे साप.

आढळ -: काश्मीर वगळता भारतात सर्वत्र.

वास्तव्य -:वारुळे, उंदराची बिळे, पाणथळ जागा,गवताळ प्रदेश व भातशेती तसेच जंगले व मानवी वस्ती.

वैशिष्ट्ये -: दिनचर.अतिशय चपळ. झाडावर व पाण्यात पण पोहू शकतो. सहसा चावत नाही. पण डिवचला असता मानेजवळचा भाग फुगवून डुरकण्यासारखा आवाज करतो व हल्ला करतो.

संदर्भपुस्तक -: साप, (निलीमकुमार खैरे)

१. धामण सापाच्या शेपटीस विषारी काटा असतो.

उत्तर :- धामणीच्या वा कुठल्याही सापाच्या शेपटीस काटा नसतो. विषारी सापाचे विष हे सापाच्या विषदंतात असत जे विषग्रंथी मार्फत येतेे.

२. नाग (चोका) व धामण यांचे मीलन (लाग होते)..?

उत्तर :- सर्व सापांचे मीलन हे स्वजातीतच होते. प्रत्येक सापांच्या जातीत (भारतामधे अपवाद – वाळा साप) नल व मादी आसे स्वतंत्र लिंग असतात. मीलनाच्या वेळी धामण साप नागासारखे आपले शरीर१/४ वर उचलतात त्यामुळे पाहणार्यास ते नाग (चोका) जातीचे साप आहेत आसा भास होतो. यात दोन्ही साप लांबीला लहान-मोठे आसल्याने लहान साप ना व मोठा साप धामण असा लोकांचा समज होतो.

३) धामण व वासुकी सर्व सापांची जननी आहे..?

उत्तर :- भारतात वाळा साप वगळता, सर्व सापांच्या जातीमधे नर व मादा असे दोन स्वतंत्र लिंगाचे साप असतात व मादा साप स्वजातीच्या सापांलाच जन्म देते.

विनंती :-

१) धामण सापास उंदराचा कर्दनकाळ असे म्हटले जाते. आढवड्यात एक धामण साप साधारणत: ४ उंदीर फस्त करते. (सर्वेनुसार एक उंदराची जोडी वर्षाला ७२९ पिल्लांना जन्म देते.) व उंदीर हे शेतकर्यांच्या एकूण धान्याच्या ३०% धान्याची नासाडी करतात. व २१ सा व्या शतकात घुशी व उंदरांना त्यांच्या बिळात जाऊन त्यांचा नायनाट करणारी सापांशिवाय दुसरी मिसाईल अजूनपर्यंत तयार झालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सर्पमिञ जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा