माढा दि.१८ ऑगस्ट २०२०:भारतीय जनता पार्टीच्या किसान युवा मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे केला आहे. खरीप हंगामा अर्ध्यावर आला आहे. बँकेकडून राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तसेच बँका शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रे मागून वेळ व पैसा खर्च करण्यास भाग पाडत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत.भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय टोणपे यांच्या अध्यक्षतेखाली टेंभुर्णी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना निवेदने देण्यात आली आहेत. आदीच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आणि आता भरीसभर म्हणून कि काय बँका त्रास देऊ लागल्या आहेत. पिककर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांना विनाकारण कागदपत्रे मागुन नाहक त्रास देऊ नये ही नोटीस देऊनही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास बँकेत ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा शिवाजी कोकाटे यांनी दिलेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील.