साहेब..सांगा आम्ही जगायचं कसं

नाशिक: माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीत शेतकऱ्यांनी पवारांना साकडे घातले की, साहेब, सांगा आम्ही जगायचं कस..हे सांगताना शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते.
राज्यात एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकसान झालेल्या शेतमालाची पहाणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्याला सर्व तोपरी मदत करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा