मोदी-ट्रम्पच्या कारकीर्दीत ३ अमेरिकन कंपन्यांनी भारतातून गुंडाळला आपला व्यवसाय…!

हरियाणा, २५ सप्टेंबर २०२०: भारतात हार्ले-डेव्हिडसन चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकन कंपनी हार्ले-डेव्हिडसननं’ भारतात आपलं उत्पादन व विक्री ऑपरेशन बंद करण्याची घोषणा केलीय. वास्तविक, कमी झालेली विक्री आणि नफा कमी झाल्यामुळं कंपनीनं भारतात व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

अमेरिकेतील बाईक उत्पादक हार्ले डेव्हिडसन’नं आपले खर्च ७५ मिलियन डॉलर्सनी कमी करण्याची योजना आखली असून त्याद्वारे कंपनी भारतात उत्पादन बंद करीत आहे. कंपनी आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करणार आहे. हार्ले डेव्हिडसन यांचा हरियाणाच्या बावळ येथे असेंब्ली प्लांट आहे, जो ऑगस्ट २००९ मध्ये सुरू झाला होता.

हार्ले डेव्हिडसन यांनी एक निवेदन जारी केलं आहे आणि असं म्हटलं आहे की, ते काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून बाहेर पडत असल्यानं भारतात विक्री व उत्पादन प्रक्रिया बंद करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हार्ले डेव्हिडसन’नं अमेरिकेसारख्या अधिक फायदेशीर कोर बाजाराकडे लक्ष देण्याची रणनीती उघड केली.

 

गेल्या काही वर्षांत हार्ले-डेव्हिडसन बाइक्सची मागणी भारतामध्ये सातत्यानं कमी होत आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचं झालं तर भारतात हार्ले-डेव्हिडसन बाईकची विक्री आकडेवारी २,५०० युनिट्सपेक्षा खूपच कमी आहे.

खरं तर, एप्रिल ते जून या दरम्यान, कंपनी यावर्षी कोरोना साथीच्या आणि ऑटो क्षेत्रात सुरू असलेली मंदी दरम्यान केवळ १०० बाइक्स विकू शकली. १० वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत उतरलेल्या हार्ले डेव्हिडसला गुंतवणूक असूनही भारतीय बाजारपेठेत आपला पाय रोवण्यास अपयशी ठरली.

 

भारतात हार्ले-डेव्हिडसन असेंब्ली प्लांट बंद झाल्यामुळं आता भारतातील दुचाकी डीलरशिपला थायलंडहून दुचाकी आयात करावी लागणार आहे. थायलंडवरून ऑर्डर दिल्यावर किंमतींमध्ये मोठी वाढ होईल. कारण, आयातीवरही आयात शुल्क भरावं लागंल, ज्यामुळं किंमती वाढतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर हार्ले-डेव्हिडसन ही तिसरी कंपनी आहे जीनं भारतातून आपला कारोबार गुंडाळला आहे. यापूर्वी, जनरल मोटर्स’नं आपला व्यवसाय गुंडाळला होता आणि २०१७ मध्ये गुजरात मधील आपली शाखा विकली होती. याव्यतिरिक्त, गतवर्षी फोर्ड’नं आपला व्यवसाय गुंडाळत आपली बहुतेक मालमत्ता महिंद्र अँड महिंद्रकडं हस्तांतरित केली होती.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा