मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकविरा देवीच्या दर्शनावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कार्ला, १९ नोव्हेंबर २०२० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंब आणि कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचं चित्र आहे दिसून आले . मंदिरात सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नसल्याचं अनेक मंदिरांतल्या गर्दीची जी छायाचित्रं समाजमाध्यमांवरून पाहायला मिळत आहेत हे त्यावरून स्पष्ट होतं.

मंदिरात आजुबाजुला असलेल्या भिंतीला स्पर्श करू नये अशी सूचना आहे पण भाविक प्रदक्षिणा घालताना ती पाळताना दिसले नाहीत. सामुहिक भजन कीर्तन करू नये असं सांगण्यात आलं आहे. त्या ऐवजी भजनं आरत्यांचं ध्वनी मुद्रण ऐकवावं असं सांगण्यात आलं आहे. पण अनेक मंदिरात पाडव्याला सुरूवातच काकड आरतीनं झाली.

ग्रंथाचे पारायण करू नये अशीही सूचना करण्यात आली आहे.या सगळ्या सूचनांचं पालन होतं की नाही त्यावर लक्ष ठेवणं जिकिरीचं जाणार आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता त्यांना कोविड आचारसंसहेतेचं काटकोर पालन घडवून आणण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा