मुंबई, १० डिसेंबर २०२०: यस, बँकेचे आर्थिक आरोग्य जस जसे सुधारत आहे. तसे, या बँकेच्या शेअर्स मध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत, एस बँकेचा शेअर्स मध्ये लागोपाठ दहा टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहेत. वास्तविक, डिसेंबरमध्ये येस बँकेसाठी बर्याच चांगल्या बातम्या आल्या आहेत. आता येस बँकेच्या डेट इंस्ट्रूमेंटचे क्रेडिट रेटिंग सुधारली आहे. ज्यामुळे शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसात अप्पर सर्किट लागत आहे.
मंगळवारी, बुधवारी, या दोन दिवसात येस बँकेने अप्पर सर्किट लावल्या. येस बँकेचे शेअर्स एनएसई वर ९.९ टक्क्यांनी वधारून १९.०० रुपयांवर बंद झाले. येस बँकेने एक्सचेंजला सांगितले की ब्रिकवर्क रेटिंग्ज यांनी बँकेचे टायर I सबॉर्डिनेटेड पर्पेच्युअल बॉन्ड्स (बेसल II) ची रेटिंग बीडब्ल्यूआरडी वरून बीडब्ल्यूआर बीबी + / वर आणली आहे.
बँकेचा कॅपिटलायजेशन रेशो वाढल्यामुळे बँकेच्या रेटिंग मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. आधीच्या अहवालानुसार म्यूचुअल फंड इंडस्ट्री बॉडी एसोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) येस बँकेचे शेअर्स मिडकॅप श्रेणीतून लार्ज कॅप प्रकारात सुधारित करेल. एएमएफआय ५ जानेवारी २०२१ रोजी समभागांच्या श्रेणींची नवीन यादी प्रसिद्ध करेल.
खरं तर, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) येस बँक सांभाळली आहे. आता बँक आपला व्यवसाय वाढविण्यात व्यस्त आहे. येस बँकेच्या शेअर्समधील सातत्याने होणारी वाढ यामुळे बँकेची मार्केट कॅपही वाढली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे