पुरंदर, ११ डिसेंबर २०२०: राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींना कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महीन्या पासून याग्रामपंचायतीचे काम प्रशासक करीत आहेत. त्या सर्व ग्रामपंचायतींना आता लोक नियुक्त कारभारी मिळणार आहे. १५ जानेवारीला यासाठी मतदान होणार असल्याने गाव पुढाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेली अनेक दिवस राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील विकासाचा गाडा थांबला होता. आज राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्या नंतर लोकांमध्ये आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. पुरंदर तालुक्यामध्ये ९३ ग्रामपंचायती आहेत. त्या पैकी ६८ ग्रामपंचायतीची निवडणूक आता होणार आहे. नुकतेच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाल्याने गावा गावातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पुरंदर मध्ये काँगेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत जोमाने उतरणार आहेत. यापूर्वी बऱ्याचश्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे व काँग्रेसचा वर चस्मा होता.
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या ताब्यातील ग्राम पंचायती आपल्या ताब्यात घेण्याचा मोठा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. सेनापती शिवाय लढणाऱ्या शिवसेनेकडून कसा प्रतिकार होतोय व आता सत्तेत एकत्र असलेले हे तिन्ही पक्ष एकत्र लढतात की एकमेकांच्या विरोधात यावरच येथील निवडणुकीतील रंगत अवलंबून आहे.
यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय बाळा पेक्षा गावातील स्थानिक गट तट व आघाड्या प्रबळ ठरतील असा अंदाज लोकांकडून वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केल्या प्रमाणे मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी याबाबतची नोटीस जाहीर होणार आहे. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. दि.४ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तर दुपारी ३ नंतर चीन्हांच वाटप करण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहेत. तर १८ जानेवारी रोजी मत मोजणी होणार आहे. तर २१जानेवारी रोजी निकालाची अधिसूचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. निवडणूक प्रचाराला यावेळी १३ दिवस मिळणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आज पासून आचासंहिता जाहीर झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे