रोहतक, १६ डिसेंबर २०२०: हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्या कारणानं आता त्यांची प्रकृती आणखी बिघडू लागली आहे. त्यांना पीजीआय रोहतककडून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना अंबाला रुग्णालयातून पीजीआय रोहतक येथे रेफर केले होते. अनिल विज यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे.
विशेष म्हणजे २० नोव्हेंबरला अनिल विज यांनी कोरोना लस कोव्हॅकसिन घेतली होती. ५ डिसेंबर रोजी त्यांनी ट्विट केलं की, लस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. अनिल विज यांना भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित केलेल्या कोव्हॅकसिनचा डोस देण्यात आला होता.
नंतर अनिल विज स्वत: म्हणाले की, डॉक्टरांनी त्यांना आधीच सांगितलं होतं की, कोरोना लस दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे १४ दिवसानंतर काम करण्यास सुरवात करते. कोरोनाचा दुसरा डोस पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर आणि नंतर १४ दिवसांनंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात. तरच तुम्हाला कोरोना पासून संरक्षण मिळू शकेल. म्हणजेच, या संपूर्ण प्रक्रियेस ४२ ते ४५ दिवस लागतात. यादरम्यान कोरोनाविरुद्ध या लस मुळे कोणतेही संरक्षण नाही.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्यानं भारत बायोटेकनं विकसित केलेल्या कोविड -१९ विरूद्ध देशी संभाव्य लस कोव्हॅकसिनसाठी क्लिनिकल ट्रायल फेज २ मध्ये विज हे प्रथम स्वयंसेवक झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे