बारामती स्पोर्टस फाउंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

बारामती २३ जानेवारी २०२१ : बारामतीत नोव्हेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होणार असुन.स्पर्धेला राज्यातील तसेच केनिया ,युरोप कंट्री ,युथोपिया येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या माध्यमातुन तरुणांना सायकल राईड करुन राज्यातील ३५० किल्यांची माहिती इतिहास तज्ञांकडूम दिली जाणार आहे.याची सुरुवात बारामतीतुन करून याची व्याप्ती महाराष्ट्रभर करणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश ननवरे व प्रशांत सातव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बारामती शहराचे नाव राजकीय पटलावर मोठे आहेच.तसेच ताकतीचे खेळाडू घडवण्याचा उद्देश घेऊन बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन मंगळवार ते शुक्रवार तरुणांसाठी मार्गदर्शन करणार असून तरुणांच्या मनात देशप्रेम वाढावे सध्याची तरुणाई मैदानापेक्षा मोबाइल मध्ये जास्त अडकली आहे.त्यांना व्यायाम ,आहार ,याचे मार्गदर्शन करुन जीवन नोरोगी करा.यासाठी त्यांच्या पालकांना देखील यामध्ये सहभागी करणार आहे.मंगळवारी सायकल ट्रर्निंग त्याची महिती तसेच बुधवारी ते शुक्रवार डेंगळे गार्डन येथे स्ट्रेंथ वर्कआऊट घेतला जाणार असून ८ ते ६५ वर्षाच्या नागरिकांना मोफत ट्रेनिंग देणार आहे.ननवरे यांनी आयर्न मॅन स्पर्धेसाठी मोठी फी द्यावी लागली होती. याचा तरुणांना फायदा व्हावा हा उद्देश आहे.तरुणांना
रनिंग,सायकलिंग,स्विमिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करणार असल्याचे ननवरे यांनी
सांगितले.व्यायाम,आहार कसा व कोणता असावा तरुणांना मानसिक व शारीरिक सुदृढ करण्यासाठी दर महिन्याला व्याख्यान घेणार आहे.मानवतावाद हाच धर्म मानून जातिभेद नष्ट होऊन एकोपा निर्माण व्हावा हा उद्देश आहे.देशासाठी शहीद झालेल्या व बॉर्डर वरील सैनिक यांची कृतज्ञता म्हणून २६ जानेवारीला रक्तदान शिबिर करणार असून यासाठी ७१ लोकांनी नावनोंदणी केली आहे.

बारामती तालुक्यातील खेळाडूंना वेगळे बक्षीस असुन १० किमी फास्ट रनिंग,२१ किमी हाफ रनिंग,४२ किमी फुल मॅरेथॉन तर प्रत्येकाला भाग घेता येईल अशी ३ किलोमीटर फन रण होणार आहे.स्पर्धेत सहभाग घेणाऱ्याला आकर्षक किट ,मेडल, मिळणार आहे.स्पर्धेसाठी ३ हजार पाहुणे येणार असून शहरातील व्यवसायाला हातभार लागेल.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा