१४ फेब्रुवारीला भारतीय लष्कराला मिळणार ११८ देशी लढाऊ अर्जुन टँक

नवी दिल्ली, १३ फेब्रुवरी २०२१: देशात तयार करण्यात आलेल्या लढाऊ विमान तेजसच्या यशानंतर आणखी एक स्वदेशी लढाऊ टँक सैन्यात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वदेशी निर्मित टँक अर्जुन १४ फेब्रुवारी रोजी सैन्यात सामील होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमात अर्जुन टँकचा भारतीय सैन्यात समावेश केला जाईल. संरक्षण संशोधन विकास संघटनेच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११८ अर्जुन टँक सैन्यात दाखल होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने सर्व ११८ अर्जुन टँक सैन्यात समाविष्ट करण्यास मान्यता दिली असून, त्याचे मूल्य ८,४०० कोटी रुपये आहे. हा टँक डीआरडीओने विकसित केला आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत १४ फेब्रुवारी रोजी चेन्नईत अर्जुन टँकची उन्नत आवृत्ती सैन्यात दाखल होईल.

या अर्जुन टँकचा सैन्यात समावेश झाल्यानंतर आणखी एक आर्मर्ड रेजिमेंट तयार होईल. तत्पूर्वी, रेजिमेंटची स्थापना १२४ टँक सैन्यात दाखल झाल्यानंतर करण्यात आली होती. रेजिमेंट तयार करण्यासाठी आता टँकची संख्या सहाने कमी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी केरळमधील कोची येथे ही अनेक प्रकल्प देशासाठी समर्पित करतील.

विशेष म्हणजे यावर्षी तामिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पार्टी (भाजप) तमिळनाडूमध्ये एआयडीएमकेशी करार करून केरळमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांची ही भेट दक्षिणेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसाठी महत्वाची मानली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा