दिल्ली १० जुलै २०२१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणा-या ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही, यावरचा संभ्रम गेला. जागतिक क्रमावारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला मिळालेल्या ड्रॉ बाबत तीने समाधानी असल्याचं सांगितलं. मात्र ऑलिम्पिकमधील आव्हान खडतर असल्याचंदेखील सिंधूनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी सिंधूच्या समोर जागतिक क्रमवारीत ३४ नंबरची असलेली चेऊंग गान यी हिच्याबरोबर लढावं लागणार आहे. तसेच इस्त्राइलची ५८ व्या क्रमांकावर असलेली सेनिया पोलिकापोर्वा हिचेही आव्हान असेल. हा ड्रॉ नक्कीच चांगला आहे. पण हाँगकाँगची चेऊंग ही एक लढवय्यी आहे. त्यामुळे सिंधूची पहिलीच लढत नक्कीच रंगेल, यात काही वाद नाही.
जागतिक क्रमवाऱीत सिंधू सातवी आहे. तिला तिचा फॉर्म टिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे सामन्यातली प्रत्येक गुण आणि स्पर्धेतली प्रत्येक लढत माझ्यासाठी महत्त्वाची असल्याचं सिंधूनं सांगितलं. त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल, हे देखील तितकचं महत्त्वाचं. याआधी या दोघींबरोबर तिची स्पर्धा झाली असून ती तेव्हा जिंकली होती.त्यामुले तिला यावेळीही आपण जिंकू असा आत्मविश्वास वाटत असल्याचंही तिने सांगितंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस