मुंबई, १२ जुलै २०२१: गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या पहिल्या १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ९२,१४७.२८ कोटी रुपयांची घसरण झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक तोटा झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस व्यतिरिक्त इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवलही गेल्या आठवड्यात घसरले, दुसरीकडे एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचे बाजार मूल्यांकन वाढले.
या आठवड्यात टीसीएसचे बाजार भांडवल ४३,५७४.८३ कोटी रुपयांनी घसरून ११,८६,५६३.२० कोटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ३५,५००.८८ कोटी रुपयांनी घसरून ते १३,१४,२९३.३५ कोटी रुपयांवर गेले आहे.
या काळात हिंदुस्तान युनिलिव्हरची बाजारपेठेतील स्थिती ९,१३९.९ कोटी रुपयांनी घसरून ५,७५,५५५.२८ कोटी आणि इन्फोसिस १,९८१.५ कोटी रुपयांनी घसरून ६,६५,९३०.२४ कोटी रुपयांवर गेली. आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य १,१०२.३३ कोटी रुपयांनी घसरून ४,४२,३०२.४२ कोटी रुपयांवर गेले आणि एसबीआयचे मूल्य ८४७.८४ कोटी रुपयांनी घसरून ३,७८,०४६.५४ कोटी रुपयांवर गेले.
या ट्रेंडच्या उलट, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात ११,६९८.०१ कोटी रुपयांनी वाढून ८,३०,००२.६७ कोटी रुपये झाले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल ८,३३२.६२ कोटी रुपयांनी वाढून ३,७०,३८०.५८ कोटी रुपयांवर गेले.
सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँक यांचा क्रमांक लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे