“माउस हरीण” लुप्त होण्याच्या मार्गावर

सिल्वर-बॅकड चँवरोटाइन ही एक हरीणाची सर्वात लहान प्रजाती आहे. याला “माउस हरीण” असंही म्हटलं जातं. मात्र, डायनोसॉर प्रमाणे हरीणाची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
उंदरासारखे दिसणाऱ्या हरीणाच्या पाठीवर चांदीसारखा रंग असतो. त्यामुळे त्यांना सिल्वर-बॅकेड चँवरोटाइन किंवा माउस हरीण म्हटलं जाते. “नेचर इकॉलॉजी अ‍ॅन्ड इव्होल्यूशन जर्नल”मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, हा प्राणी ३० वर्षांआधी दिसला होता. आज पुन्हा एकदा व्हिएनामच्या जंगलात हे हरीण दिसले. या प्राण्याचा समावेश रेड लिस्टमध्ये म्हणजे लुप्त होणाऱ्या दुर्मिळ प्राण्यांमध्ये करण्यात आला आहे.

सिल्वर-बॅकेड चँवरोटाइनबाबत प्रथम १९१० मध्ये माहिती मिळाली होती. हे हरीण व्हिएतनाममधील’ हो लची मिन्ह’ शहरापासून साधारण ४५० किलोमीटर दूर ‘न्हा ट्रांग’जवळ आढळून आले आहे.

१९९० नंतर हरिण न दिल्याने तज्ज्ञांनी हे गृहीत मांडले की, शिकारीमुळे हा प्राणी लुप्त झाला असेल. जंगली प्राण्यांची लुप्त होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे जंगलांची तोड आणि दुसरं म्हणजे बेकायदेशीर शिकार.

लाइबनिट्स इन्स्टिट्यूट फॉर जू अ‍ॅन्ड वाइल्ड लाइफ रिसर्चमध्ये आणि ग्लोबल वाइल्ड लाईफ कंजर्व्हेशनसोबत काम करणारे एन नगुयेन म्हणाले की, सिल्वर-बॅकेड चँवरोटाइन अजून लुप्त झाले नाही. यासाठी नगुयेनने स्थानिकांसोबक तज्ज्ञांना त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे हरीण आढळून आलं होतं.

कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली तेव्हा आम्हाला आश्चर्य झालं. आम्ही सिल्वर फ्लॅक्ससोबत सिल्वर-बॅकेड चँवरोटाइनचे फोटो पाहिले. दक्षिण पूर्व आशिया खासकरून व्हिएतनाममध्ये हे हरिण आढळून येतं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा