उस्मानाबाद: राज्य सरकारकडून नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं पोर्टल बंद करा अशी मागणी पुढे येत आहे. राज्य सरकारच्या वतीने वर्ग तीन आणि चार पदांच्या भरतीसाठी भरती करता यावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये हे पोर्टल सुरू केलं होत. डिजिटल मूळ मुलांना जास्त फि भरावी लागत आहे.सर्वर डाऊन मुळे अर्ज भरण्याचा वेळ वाढला आहे. ऑनलाईन पेमेंट साठी विद्यार्थ्यांना वेगळे पैसे भरावे लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे हे महा पोर्टल बंद करा अशी मागणी करण्यात येत आहे.
महा पोर्तलमुळे एकाच पदाची भरती करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ दिवस लागले आहेत. या तीन वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांनी या पोर्टल च्या विरोधात अनेक मोर्चे काढले आहेत. त्यामुळे या महा पोर्टल द्वारे परीक्षा घेणे बंद करा अशी मागणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी ६५ मोर्चे काढले आहेत.