Samsung Galaxy F42 5G भारतात 29 सप्टेंबरला होणार लॉन्च, हे फीचर्स मिळतील

पुणे, 26 सप्टेंबर 2021: Samsung Galaxy F42 5G भारतात 29 सप्टेंबरला लॉन्च होईल. ही माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांची पुष्टी केली आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 12 5G बँड आणि 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह येईल. कंपनीचा Galaxy F सीरिजचा हा पहिला 5G स्मार्टफोन असेल.

Samsung Galaxy F42 5G भारतात 29 सप्टेंबरला लॉन्च होईल. या फोनचे लाँचिंग दुपारी 12 पासून केले जाईल. सॅमसंगने या आगामी स्मार्टफोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट तयार केली आहे. लॉन्चच्या तारखेबरोबरच फोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन्स देखील या पेजवर सांगितले गेले आहेत.

Samsung Galaxy F42 5G ची विक्री सॅमसंगची अधिकृत वेबसाइट फ्लिपकार्ट आणि निवडक किरकोळ स्टोअरद्वारे केली जाईल. मायक्रोसाइटमध्ये दिलेल्या प्रतिमेनुसार हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy F42 5G ची वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-एचडी + इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले असेल. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येईल.

हा फोन 12 5G बँड सपोर्टसह येईल. हे बँड- N1 (2100), N3 (1800), N5 (850), N7 (2600), N8 (900), N20 (800), N28 (700), N66 (AWS-3), N38 (2600), N40 (2300), N41 (2500) आणि N78 (3500) असतील.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपचा प्राथमिक कॅमेरा 64MP असेल. तसेच, कंपनीने कळवले आहे की हा नवीन फोन 5,000mAh बॅटरीसह येईल. या फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणात असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा