मुंबई : घरकूल घोटाळा प्रकरणीमाजी मंत्री सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना तात्पुरता ३ महिन्यांसाठी वैद्यकीय जमीन देण्यात आला आहे.
घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह इतरांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
ओरतिनिधिकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैन यांची तब्येत खराब असल्याच्या कारणावरून जैन यांना तीन महिन्याचा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने हा तात्पुरता ३ महिन्यासाठी वैद्यकीय जामीन दिला आहे.