नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 शिखर परिषद आणि COP26 परिषदेसाठी ब्रिटनमध्या आहेत. ही परिषद 2 नोव्हेंबरला संपणार आहे. भारतात परतल्यानंतर मोदी 3 नोव्हेंबर रोजी लसीकरण आढावा बैठक घेतील. भारताने नुक्ताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार कोला. मात्र सगळ्याच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षीत टप्पा गाठण्यात अयश्वी ठरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसरी मात्रा देण्याची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 40 हून अधिक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील.यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या बौठकीत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
लसीकरणाचे आकडे
दरम्यान, निर्बंध उठवले जात असले तरी, लसीकरण मोहीम भारतात जोरात सुरू आहे. या वर्षी जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली. देशात 106.14 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकत्रितपणे, देशातील संपूर्ण प्रौढ पात्र लोकसंख्येपैकी, 73.16 कोटींहून अधिक लोकांना लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. प्रत्यक्षात, देशात दोन्ही डोस मिळुन जवळपास 33 कोटी लोकांना पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. त्यापैकी 68,04,806 लसींचे डोस गेल्या 24 तासांत देण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे