RCB vs RR, 27 एप्रिल 2022: 26 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 29 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले असून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत ते आघाडीवर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 144 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ अवघ्या 115 धावांवर सर्वबाद झाला होता. या आयपीएलमधील बंगळुरूचा हा चौथा पराभव आहे. विराट कोहली सतत अपयशी ठरत आहे, ज्याचा फटका आरसीबीला बसतोय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू डाव (115/10, 19.3 षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल सांगायचं तर, यावेळी विराट कोहली सलामीला आला, त्याने सीमारेषेवरून आपले खातं उघडलं, तेव्हा असं वाटलं की आज नशीब त्याच्यासोबत आहे. पण तसं झालं नाही, विराट कोहली अवघ्या 9 धावा करून बाद झाला. तो निघून गेल्यानंतर फाफ डू प्लेसिसने काही काळ कमान सांभाळली, पण त्यानेही फक्त 23 धावांची मजल मारली.
कुलदीप सेनने बेंगळुरूला येथे सलग दोन धक्के दिले, डु प्लेसिसनंतर ग्लेन मॅक्सवेलही गोल्डन डकचा बळी ठरला. संघात परतलेल्या रजत पाटीदारला केवळ 16 धावा करता आल्या. बंगळुरूला दिनेश कार्तिक कडून अपेक्षा होती, पण गोंधळामुळे तो धावबाद झाला.
उर्वरित काम राजस्थानकडून रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहलच्या फिरकीने केले, ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या आणि कमी धावा दिल्या.
पहिली विकेट – विराट कोहली 9 धावा, (10/1)
दुसरी विकेट – फाफ डु प्लेसिस 23 धावा (37/2)
तिसरी विकेट – ग्लेन मॅक्सवेल 0 धावा, (37/3)
चौथी विकेट- रजत पाटीदार 16 धावा (58/4)
पाचवी विकेट – सुयश प्रभुदेसाई 2 धावा, (66/5)
सहावी विकेट- दिनेश कार्तिक 6 धावा (72/6)
सातवी विकेट- शाहबाज अहमद 17 धावा (92/7)
आठवी विकेट – वानिंदू हसरंगा 18 धावा (102/8)
दहावी विकेट- मोहम्मद सिराज 5 धावा (109/9)
दहावी विकेट – हर्षल पटेल 8 धावा (115/10)
राजस्थान रॉयल्सचा डाव
या सामन्यात राजस्थानची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने पहिल्या पाच षटकात तीन विकेट गमावल्या. ऑरेंज कॅप विजेता जोस बटलर यावेळी अपयशी ठरला आणि त्याला केवळ 8 धावा करता आल्या. मात्र कर्णधार संजू सॅमसनने सुरुवातीलाच रंग दाखवत झटपट खेळी केली. संजूही 27 धावा करून बाद झाला.
या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावणाऱ्या राजस्थानकडून रियान परागने सर्वोत्तम खेळी खेळली. रियान परागने केवळ 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावा केल्या. रायनच्या याच अप्रतिम बळावर राजस्थानने एका गडबडलेल्या डावानंतरही 144 धावांची मजल मारली.
पहिली विकेट – देवदत्त पडिककल 7 धावा (11/1)
दुसरी विकेट – रविचंद्रन अश्विन 17 धावा (33/2)
तिसरी विकेट – जोस बटलर 8 धावा (33/3)
चौथी विकेट- संजू सॅमसन 27 धावा (68/4)
पाचवी विकेट – डॅरेल मिशेल 16 धावा (99/5)
6वी विकेट – शिमरॉन हेटमायर 3 धावा (102/6)
सातवी विकेट – ट्रेंट बोल्ट 5 धावा (119/7)
आठवी विकेट – प्रशांत कृष्णा 2 धावा (121/8)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहली सलामी देणार असल्याचे आरसीबीच्या कर्णधाराने सांगितलं. आरसीबीने त्यांच्या संघात बदल केला असून, अनुज रावतच्या जागी रजत पाटीदार प्लेइंग-11 मध्ये आलाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग-11: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरेल मिशेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे