वारजेत गुरु – शिष्य संयुक्त जयंतीनिमित्त प्रा. बानुगडे यांचे व्याख्यान

वारजे, 1 मे 2022: शिवभिम सामाजिक संघटना महा., निदान फाऊंडेशन, मानवता सामाजिक सेवा संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिव-शाहु-फुले-आंबेडकर विचारांचे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून इतिहासातील दाखले देत प्रभावीपणे मांडले. तसेच या देशाला शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांचे व्याख्यान तरुणांमध्ये प्रेरणा अन् नवचैतन्याची स्फूर्तीदायी ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत कांबळे, अमित वांजळे, दिपक बलाढे, किशोर पवार, राहुल रिकीबे यांनी केले होते.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, सचीन दोडके, सायली वांजळे-शिंदे, युवक काँग्रेसचे सचीन बराटे, अतुल दांगट, माजी सरपंच सुभाष नाणेकर, विकास दांगट, पीडीसी बॅंकेचे संचालक प्रविण शिंदे, स्विकृत सभासद सचिन विष्णु दांगट, सरपंच नितीन धावडे, भगवान गायकवाड, आरपीआयच्या संगीता आठवले, दिलीप कदम, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडीत यांनी केले. प्रस्ताविक चंद कांबळे यांनी केले तसेच आभार दिपक बलाढे यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा