छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित साईंबाई राणीसाहेब यांचा पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांचा मोठ्या भावाचे नाव संभाजी होते त्यांची हत्या अफजलखानाने दगाबजिने केलि होती. त्यांचा नावावरून याना संभाजी नाव दिले गेले.
राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे ‘केदारेश्वर’ तर दुसर्या टेकडीचे नाव आहे ‘राजगादी’.
‘राजगादी’ हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता.
या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.
शंभूराजाना त्यांचा अयुशाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्याना अवघे ८ वर्षे लाभले (राज्याभिषेक १६. ०१. १६८१ व मृत्यु ११. ०३. १६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमाने अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचे, त्यागाचे, बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओलखले जातात. जगाचा इतिहासात अशी नोद आहे की शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांचा अयुशात जेवडया लढाया केल्या त्यासर्वात त्यानी विजय मीळावला होता. अपल्या छोट्याशा कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीच, डच, व इतर अनेक आशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केले होते. सर्वानी शंभू राजांचा पराक्रमापुढे हात टेकले होते.
अशा महापराक्रमी परमप्रतापी योध्या चरनी शतषा नमन.