पुणे, 2 जून 2022: Twitter वर युजर्सकडून एडिट बटण साठी मागणी होत आहे. पण आता ट्विटर नाही तर व्हॉट्सअॅप लवकरच एडिट बटण रिलीज करू शकते. एका नवीन अहवालानुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अॅपच्या बीटा आवृत्तीसाठी एडिट बटणाची चाचणी करत आहे.
व्हॉट्सअॅपसाठी अद्याप डेडिकेटेड एडिट पर्याय दिलेला नाही. मेसेज पाठवल्यानंतर यूजर्सकडे फक्त तो डिलीट करण्याचा पर्याय असतो. पण, हे नवीन फीचर सुरू केल्यामुळे यूजर्स टेक्स्ट मेसेज पाठवूनही एडिट करू शकणार आहेत.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने या फीचरबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, रिअॅक्ट मेसेज फीचर रिलीझ केल्यानंतर कंपनी लवकरच पाठवलेल्या मेसेजबाबत एडिट पर्यायही देऊ शकते.
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅप पाच वर्षांपूर्वी या फीचरवर काम करत होते. मात्र, ते पुन्हा बंद करण्यात आले. आता पाच वर्षांनंतर कंपनी पुन्हा एकदा एडिट बटणावर काम करत आहे.
Wabetainfo ने व्हॉट्सअॅपच्या या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये असे दाखवण्यात आलंय की, मेसेज पैकी एखादा मेसेज सिलेक्ट केल्यास एडिट साठी एक डेडिकेटेड ‘एडिट’ बटण मिळेल.
म्हणजेच कॉपी आणि फॉरवर्ड मेसेज व्यतिरिक्त यूजरला नवीन एडिट बटणाचा पर्यायही मिळेल. एडिट बटण निवडून, संदेश पाठवल्यानंतरही तुम्ही शुद्धलेखनाच्या चुका किंवा टायपिंग दुरुस्त करू शकता. सध्या युजरला फक्त मेसेज डिलीट करण्याचा पर्याय मिळतो. हे वैशिष्ट्य सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. यामुळे, अद्याप त्याच्या सार्वजनिक उपलब्धतेबद्दल जास्त माहिती प्राप्त झालेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे