IND vs WI Series, १८ जुलै २०२२: इंग्लंडनंतर आता टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. येथे भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय आणि त्यानंतर पाच T-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. सध्या वेस्ट इंडिजने एकदिवसीय मालिकेसाठी १३ जणांचा संघ जाहीर केला आहे.
या संघात स्टार अष्टपैलू जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे. कामाच्या ओझ्यामुळे होल्डरला बांगलादेशविरुद्धच्या होम वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेशने विंडीजचा ३-० असा क्लीन स्वीप केला.
वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांच्याकडे राहील. तर उपकर्णधारपद शाई होपकडे सोपवण्यात आले. या संघात अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, ब्रँडन किंग आणि काइल मेयर्ससारखे स्टार खेळाडूही आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ:
निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उप-कर्णधार), जेसन होल्डर, शामर ब्रूक्स, कीसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, कीमो पॉल, जेडेन सील्स.
रोमारियो शेफर्ड आणि हेडन वॉल्श ज्युनियर यांना राखीव ठेवण्यात आले आहे.
धवन करणार भारतीय संघाचे नेतृत्व
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताने आपला १६ सदस्यीय संघ आधीच जाहीर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार बनला आहे.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका
पहिला एकदिवसीय – २२ जुलै संध्याकाळी ७ वाजता
दुसरी वनडे – २४ जुलै संध्याकाळी ७ वाजता
तिसरी वनडे – २७ जुलै, संध्याकाळी ७ वा
पहिला T20 – २९ जुलै
2रा T20 – १ ऑगस्ट
तिसरा T20 – २ ऑगस्ट
चौथी T20 – ६ ऑगस्ट
पाचवा T20 – ७ ऑगस्ट
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे