कोलंबो, २२ दुलै २०२२: श्रीलंकेला आता रनिल विक्रमसिंघे यांच्यानंतर दिनेश गुणवर्दे यांच्या रुपात नवीन पंतप्रधानही मिळाले आहेत. सध्या श्रीलंकेची बिघडलेली आर्थिक धुरा सांभाळण्याचे काम आता या दोघांवर आहे. याआधीचे राष्ट्रपती राजपक्षे हे सरकार आणि देश सोडून गेल्याने आता श्रीलंकेला स्थावरण्याची महत्त्वाची जबाबदारी या दोघांवर आहे. नुकतीच दिनेश गुणवर्दे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
दिनेश गुणवर्देंचा थोडक्यात परिचय…
दिनेश गुणवर्दे हे आधीपासूनच राजकारणात सक्रिय असून श्रीलंकेचे माजी संसद सदस्य आणि माजी केबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्याचबरोबर राजपक्षे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिले.
सध्या श्रीलंकेची स्थिती अतिशय हालाखाची आहे. इंधन, जीवनावश्यक गोष्टी, एवढचं नव्हे तर इतर देशांशी दळणवळण करुन पैसे मिळवण्यासाठी आता श्रीलंकेकडे पैसे नाही. तसेच लोकांना रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे श्रीलंकेची एकुणच देशव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था पूर्ववत करणे, हे या दोघांपुढे मोठे आव्हान आहे.
याआधी विक्रमसिंघे यांनी सहा वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. यावेळी विक्रमसिंघे आणि गुणवर्दे यांनी वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून देशासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. आता विक्रमसिंघे आणि गुणवर्दे श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळणार का? हे काळच ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस