Commonwealth Games 2022, ३ ऑगस्ट २०२२: २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक कांस्यपदक मिळाले आहे. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने बुधवारी १०९ किलो वजनी गट जिंकला. त्याने या प्रकारात आश्चर्यकारक कामगिरी करत देशाच्या नावावर कांस्यपदक मिळवले. भारताचे आतापर्यंतचे हे १४ वे पदक आहे, तर हे चौथे कांस्य पदक आहे. लवप्रीत सिंगने या गेममध्ये एकूण ३५५ (१६३+१९२) किलो वजन उचलले. वजन उचलणे, हा राष्ट्रीय विक्रम आहे. लवप्रीत सिंगने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
लवप्रीत सिंगने रचला असा इतिहास
लवप्रीत सिंगने स्नॅच राऊंडमध्ये शानदार खेळ दाखवला आणि तिन्ही प्रयत्नांमध्ये तो यशस्वी ठरला. त्याने स्नॅच फेरीत अनुक्रमे १५७ किलो, १६१ किलो आणि १६३ किलो वजन उचलले. यानंतर लवप्रीतने क्लीन अँड जर्क फेरीतही तिन्ही प्रयत्न यशस्वी केले आणि अनुक्रमे १८५ किलो, १८९ किलो, १९२ किलो वजन उचलले. अशाप्रकारे लवप्रीतने एकूण 355 के.जी. (१६३ + १९२) वजन उचलले.
लवप्रीत सिंगने क्लीन अँड जर्कची शेवटची फेरी पूर्ण केली तोपर्यंत तो अव्वल होता, पण नंतर इतर खेळाडूंनी त्याला मागे टाकले. एका क्षणी, खेळाच्या शेवटी, लवप्रीत तिसऱ्या क्रमांकावर आला आणि कांस्यपदक त्याच्या नावावर झाले. या सामन्यात कॅमेरूनच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले, त्याने ३६१ कि.जी. वजन उचललं. तर समुआच्या खेळाडूने ३५८ के.जी. वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
स्नॅच राउंड
• पहिला प्रयत्न- १५७ KG. यशस्वी
• दुसरा प्रयत्न- १६१ KG. यशस्वी
• तिसरा प्रयत्न- १६३ KG. यशस्वी
क्लीन अँड जर्क राउंड
• पहिला प्रयत्न- १८५KG. यशस्वी
• दुसरा प्रयत्न- १८९ KG. यशस्वी
• तिसरा प्रयत्न- १९२ KG. यशस्वी
कोण आहे लवप्रीत सिंग?
२४ वर्षीय लवप्रीत सिंगकडून भारताला गोल्डच्या आशा आहेत. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये याच प्रकारात रौप्य पदक जिंकले. येथे विजय मिळवून तो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरला. अमृतसर, पंजाब येथील रहिवासी असलेल्या लवप्रीतने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले, तर तो कॉमनवेल्थ ज्युनियर चॅम्पियन देखील राहिला आहे.
आतापर्यंत भारताला एकूण १३ पदके मिळाली असून त्यापैकी बहुतांश पदके वेटलिफ्टिंगमधून आली आहेत. एकूण १३ पैकी ८ पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली असून त्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे