शहरातील टोल लवकरच रद्द होणार नितीन गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२२: लवकरच देशामध्ये शहरी भागतील टोल रद्द केला जाईल असी घोषणा नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहे. शहरी भागतील लोकांना १० किलोमीटरच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी ७५ किलोमीटर रस्त्याचा टोल द्यावा लागतो. त्यामुळं त्यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. या पद्धतीमध्ये लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यसभेत खासदारांनी टोलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं आता शहरातील टोल रद्द होणार आहेत. देशातील टोल नाक्यांचा जनक आपणच असल्याचे गडकरी यावेळी सांगितले. आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना प्रथमच बी ओ टी तत्त्वावर महामार्ग बांधल्याचं त्यांनी निदर्शनास आणले. आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळं शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

राज्यसभेत बोलताना नमूद केलेले गडकरींचे ठळक मुद्दे,

आपण स्वतः या देशात बीओटीचा सगळ्यात पहिला प्रकल्प महाराष्ट्रात ठाणे-भिवंडी दरम्यान राबवला होता. यापुढे आम्ही नवीन पद्धत सुरु करणार आहोत. शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. त्यामुळे रस्त्यावर टोलसाठी मोठी रांगही दिसणार नाही. टोल वसूल करण्यासाठी जी पी एस आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात नागरिकांनी टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कपात केली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी मार्च २०२२ मध्ये दिली होती. लोकांच्या सुविधेसाठी टोलच्या रांगा बंद केल्या जातील. नॅशनल हायवेवर दर ६० किलोमीटर वर एक टोल प्लाझा असेल. तसेच या अंतरामधील सर्व टोल पुढील तीन महिन्यात हटवले जातील. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळही वाचणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा